दर्शनाची ओढ

इंद्रधनु

 दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  ।

चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।।

आजपरी शरीर दुबळे साथ देईना  ।

मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।।

आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  ।

भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।।

आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  ।

अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते  ।।

चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी  ।

फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी  ।।

गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी  ।

ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी  ।।

टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला  ।

नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला  ।।

विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला  ।

देह सोडूनी पांडूरंगी चरणी  वैकूंठी गेला  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

  सर्वात तोच आहे

इंद्रधनु

  सर्वात तोच आहे

अगणित तारे जीव जीवाणूं  ।

अथांग विश्व अणू रेणू  ।। १

रंगरूप हे नेत्री दिसती  ।

भिन्न भिन्न राहूनी जगती  ।। २

रस गंध दरवळे चोहीकडे  ।

जगण्याचा तो मार्ग सापडे  ।। ३

हे जर आहे रूप ईश्वरी  ।

बघती त्याला आमुच्या नजरी  ।। ४

सुख दु:ख ही त्याची निर्मिती  ।

फिरे सदा आमचे भोवती  ।। ५

निराकार निर्गुण,  म्हणती त्याला  ।

म्हणूनच तो साऱ्यात सामावला  ।। ६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

इंद्रघनु

सर्व जीवांना जगूं द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  ।

किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।।

चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  ।

काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।।

झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  ।

भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।।

स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  ।

स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।।

जगणे आणि जगू देणे,  ब्रीद निसर्गाचे  ।

पाळीत होता तत्व महान, जीवन जगण्याचे  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

भरताची निराशा

इंद्रधनु

  भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।।

लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।।

झाली होती पितृज्ञा ती  ।

पाठवी रामा वनीं  ।।

माता कैकेयीच हट्ट करिते  ।

दूजे नव्हते कुणी  ।।

कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१,

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।

उंचबळूनी हृदय भरता  ।

कंठी दाटला सारे  ।।

शब्द फुटती मुखा मधूनी  ।

जे होते हुंदके देणारे  ।।

थरथरणाऱ्या ओठांमधूनी भाव कसे उमटतील….२,

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

लक्ष्मीसूत

इंद्रधनु

लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र,
बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात,
‘केशव’ माझे वडील असता, ‘केवशसूत’ हा ठरतो मी,
तसाच बनता ‘केशवकुमार’, मोठे होण्याची युक्ती नामी
जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे
‘लक्ष्मी’ तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आठवण

आठवण

अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली
योग्य वेळ ती येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली
शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी,
विजयी झाले ऋणाणू बंधन, बांधले होते हृदयानी,
उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा
स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा
मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक सुखांच्या आठवणी
जगण्यासाठी उभारी देतील, शरीर मनाच्या दु:खी क्षणी

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आत्मविश्वास

आत्मविश्वास

जे जे मजला हवेच होते,
मिळवित गेलो यत्न करूनी,
चालत असता जेव्हा पडलो,
उठलो होतो धीर धरूनी ।।१।।

आतंरिक ती शक्ती माझी,
पुन्हा पुन्हा तो मार्ग दाखवी,
शरिराला ती जोम देवूनी,
वाटेवरती चालत ठेवी ।।२।।

निराश मन हे कंपीत राही,
विश्वालासा तडे देवूनी,
दु:ख भावना उचंबळता,
देह जाई तेथे हादरूनी ।।३।।

परि विवेक हा जागृत होता,
विश्लेषण जो करित राही,
सुख, दु:खाचा अर्थ लावूनी,
मनास तेव्हा धीरच देई ।।४।।

गिळून घेता अपयश सारे,
खंत वाटली कधी न त्याची,
समज आली मनास ही की,
चूक असावी मार्ग निवडीची ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

अविवेकी कष्ट

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना,
कसे सुंदर होईल घरटे, रंगवित होते कल्पना ।।१।।

खिडकीवरल्या कपारीमध्ये, शोधला होता एक निवारा,
निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या, आणीत होते काडीकचरा ।।२।।

उजाडता कुणी खिडकी उघडे, चिमण्या बांधीत घरटी,
सांज समयी बंद झापडे, ठेवी त्यांना एकटी ।।३।।

नित्य दिनी प्रात: समयी, कुणीतरी फेकी कचरा समजूनी,
चिमण्या बांधीत घरटे पूनरपी, दिवसभरीचे कष्ट करूनी ।।४।।

किती काळ हे असे चालले, गेल्या थकूनी चिमण्या दोघी,
परि विचार सूचला नाही त्यांना, प्रयत्न करावा इतर जागी ।।५।।

मार्गदर्शक कुणीही नव्हता, जेंव्हां बांधीत होते घरटी,
अविचाराने देह झिजवला, राहूनी गेल्या सदैव कष्टी ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आईच्या प्रेमाचा निरोप

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम,
अनंत त्याचे दाम ।
तुलनेसी ब्रम्हांडी,
जड तुझीच पारडी ।।१।।

पुंडलीक तुझ्यासाठी,
विसरला जगत् जेठी,
कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ,
शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।

बलीदानाची तू मूर्ती,
‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती,
कष्ट करुनी वाढविले छोटे,
विसरती तुला होऊन मोठे ।।३।।

सोडीनी एकटे तुजसी,
पंख फुटता उडे आकाशी,
निरोप देऊन प्रेमाचा,
कळस गाठला महानतेचा ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कष्टाचे मोल

कष्टाचे मोल

कष्ट करुनी घाम गाळीतो,
शेतामध्यें शेतकरी,
समाधानाने मिळते तेंव्हा,
त्यास एक भाकरी ।।१।।

त्याच भाकरीसाठी धडपडे,
नोकर चाकर,
कष्टामधूनच जीवन होते,
तसेच साकार ।।२।।

कष्ट पडती साऱ्यांना,
करण्या जीवन यशदायी,
विद्यार्थी वा शिक्षक असो,
अथवा आमची आई ।।३।।

अभ्यासातील एकाग्रता,
यास लागते कष्ट महान,
त्या कष्टाचे मोल मिळूनी,
यशस्वी होईल जीवन ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com